Home  |   Sitemap  |   Contact us


New Law College, Sangli

Documentary on
Hon. Dr. Patangrao Kadam

NSS Activities


भारती विद्यापीठाचे न्यू लॉ कॉलेज, सांगली नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय असते मग ते महापूर असो वा कोरोना सारखी वैश्विक महामारी असो. कोरोना काळात सुद्धा महाविद्यालयाच्या NSS च्या विद्यार्थ्यांनी समाजकार्य चालूच ठेवले. टाळेबंदीमुळे विटा या ठिकाणी अडकून पडलेल्या 9 बिहारी कामगारांना NSS चा विद्यार्थी ऋषीकेश पाटील याने त्यांना 1 महिना पुरेल इतक्या सामानाचे किट मिळवून दिले.

तसेच गेली दिड वर्ष झाले कुस्तीची मैदाने बंद आहेत त्यामुळे उमद्या पैलवानांना खुराक मिळवणे अवघड झाले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती ही बाब समजताच ऋषीकेश पाटील याने इतर स्वयंसेवकांना बरोबर घेऊन पैलवानांना लागणाऱ्या खुरकाचे वाटप केले.

तसेच ऋषीकेश पाटील याने स्वामी विवेकानंद कोविड केअर सेंटर सांगली या ठिकाणी 8 दिवस स्वयंसेवक म्हणून रुग्णसेवा केली. त्याला याकामी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पूजा नरवाडकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तसेच NSS चे समन्वयक प्रा. प्रशांत जरंडीकर व प्रा. श्रेयश मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.

Glimpses© 2022 - Bharati Vidyapeeth, Pune. All rights reserved. Developed and maintained by Technology Department, Bharati Vidyapeeth.