Home  |   Sitemap  |   Contact us


New Law College, Sangli

Documentary on
Hon. Dr. Patangrao Kadam

भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय ऑनलाईन क्रिटिक कॉम्पिटिशन संपन्न


८ मार्च २०२१ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज, सांगलीने आयोजित केलेली राष्ट्रीय ऑनलाईन क्रिटिक कॉम्पिटिशन यशस्वीरित्या संपन्न झाली. सदर स्पर्धेचे ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास खात्याच्या कॅबिनेट मंत्री, माननीय सौ. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्राचार्य डॉ. पूजा नरवाडकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय यशोमती ठाकूर म्हणाल्या, “स्वर्गीय डॉ. पतंगरावजी कदम साहेब हे माझे गुरु आहेत व गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तनाचे व्रत जोपासणारे साहेब हे आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणास्थान राहतील.” याचबरोबर अशा नावीन्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी कॉलेजचे कौतुक केले व कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

सदर स्पर्धेसाठी देशभरातील विविध राज्यातून महाविद्यालये, विद्यापीठे व लॉ स्कूल्समधील 190 विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रथम फेरीत त्यातील 42 विद्यार्थी निवडले गेले तर अंतिम फेरीसाठी 9 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यातील सर्वोत्कृष्ट तीन विद्यार्थी श्री. अमूल्य कौशिक (व्ही. आय. पी. एस., दिल्ली), प्रज्ञा गार्गी (डी. इ. एस. लॉ कॉलेज, पुणे), ऊर्जा मिश्रा (सिमबायोसिस लॉ कॉलेज, पुणे) यांना अनुक्रमे प्रथम पारितोषिक रुपये 5000, द्वितीय पारितोषिक रुपये 3000 व तृतीय पारितोषिक रुपये 2000 देण्यात आले. सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. आनंद पवार, डॉ. ज्योती धर्म व डॉ. दीपा श्रावस्ती आदी मान्यवरांनी काम पाहिले.

कार्यक्रमाच्या समारोप समारंभासाठी अध्यक्ष म्हणून राणी दुर्गावती विश्व विद्यालय, जबलपूर मधील विधी विभागप्रमुख माननीय डॉ. दिव्या चांसोरिया यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी या प्रसंगी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व महाविद्यालयाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक संजीव साबळे यांनी केले. स्पर्धेचे संयोजन प्राचार्य डॉ. पूजा नरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. संजय आहेर व प्रा. श्रेयश मोहिते यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रश्मी अरवटगी व कु. श्रीलक्ष्मी मुंडनचेरी यांनी केले.

या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या वैचारिक चर्चा वारंवार आयोजित केल्या पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करत या अभिनव स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले.

क्षणचित्रे













© 2025 - Bharati Vidyapeeth, Pune. All rights reserved. Developed and maintained by Technology Department, Bharati Vidyapeeth.